शेतकरी बळीराजा

शेतकरी बळीराजा म्हणती हो मला 

भिक नको फक्त हमीभाव द्या पिकाला

पिक माझ पिकली सोन्यावाणी 

नजर लागावी अशी नक्षत्रावणी 

वाटत असेल सोन्याचे दिन यावे शेतकऱ्याच्या घरी 

एकच सांगतो सरकार तुम्हाला 

कर्जमाफी नको हमीभाव द्यावा पिकाला

शेतकरी बळीराजा म्हणती हो मला 

भिक नको फक्त हमीभाव द्या पिकाला





दलाल आडते आम्हा छळणार 

दोन रुपड्याचा चेक हाती टेकवणार 

आया बहिणींची अब्रू सावकार लुटणार    

वाटत असेल आम्ही घेऊ नये फास 

शेती विमा मिळो आमच्या पिकाला

भिक नको फक्त हमीभाव द्या पिकाला


पिकाविणार मी अन भाव ठरविणार तुम्ही 

कस जगायचं सांगा आम्ही 

लग्नाला आल पोरग कोणी पोरगी देईना त्याला.

कधी तरी जगाच्या पोशिन्द्याची दया यावी तुम्हाला     

भिक नको फक्त हमीभाव द्या पिकाला


डॉ. सुभाष कारंडे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अनवट सातारा भाग - २ : साताऱ्याचे ॲमेझॉन काठी-अवसरी

युद्ध नको बुद्ध हवा!

दरड दुर्घटनेतील बळी? नव्हे सरकारी अनास्थेचे बळी!