युद्ध नको बुद्ध हवा!

 युद्ध नको बुद्ध हवा! 



अंधारात चाचपडणार्‍या जगाला माणुसकीचा दिवा हवा

धर्म जातीच्या आधारे एकमेकांचा गळा घोटणाऱ्या व्यवस्थेला समानतेचा संदेश हवा 

युद्ध नको बुद्ध हवा! 

स्वार्थासाठी हैवान बसलेल्यांना प्रेमाचा ओलावा हवा

खोट्या राष्ट्रभक्तीचा बुरखा पांघरलेल्यांना देशभक्तीचा हुंकार हवा

युद्ध नको बुद्ध हवा! 

सोशल मीडियाच्या युगात गरळ ओकणाऱ्यांना नैतिकतेचा आरसा हवा 

वाट चुकलेल्या वाटसरूंना विवेकी रस्ता हवा 

युद्ध नको बुद्ध हवा! 

व्यवस्थेने नाकारलेल्यांना जगण्याचा आधार हवा 

रक्ताच पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला सन्मानाचा भाव हवा 

युद्ध नको बुद्ध हवा! 

देश रक्षणासाठी तळहातावर प्राण घेतलेल्या सैनिकास आपल्या प्रेमाचा सलाम हवा 

भारत भूच्या अंगा-खांद्यावर खेळणाऱ्या प्रत्येकाच्या नसानसात भारत माझा देश हवा 

भारत माझा देश हवा 

युद्ध नको बुद्ध हवा! 

युद्ध नको बुद्ध हवा! 

डॉ. सुभाष कारंडे, सातारा 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अनवट सातारा भाग - २ : साताऱ्याचे ॲमेझॉन काठी-अवसरी

दरड दुर्घटनेतील बळी? नव्हे सरकारी अनास्थेचे बळी!