वाहन ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजे काय?

 वाहन ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजे काय?



जीपीएस उपग्रहाच्या आधारे जमिनीवर आपल्या वाहनाचे अचूक स्थान दर्शविणाऱ्या तंत्रास वाहन ट्रॅकिंग सिस्टीम असे म्हणतात. याद्वारे आपल्या वाहनाचे वर्तमान स्थान आपल्या स्मार्टफोनवर किंवा संगणकावर उपलब्ध होते.


आवश्यकता 

  • वाहन ट्रॅकिंग सिस्टीम कार सुरक्षित ठेवण्यासाठी आणि चोरी रोखण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. 

  • याद्वारे आपल्या कारची प्रत्येक मिनिटाची माहितीही मिळू शकते. 

  • कोणत्याही कारमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवल्यास त्याच्या मदतीने चालकांच्या हालचालींवरही पूर्ण नजर ठेवता येते.

  • वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. 

  • मागील एक ते तीन महिन्यापर्यंत वाहनाच्या हालचालीबाबत माहिती उपलब्ध  होते. 

  • वाहनाने जितक्या लांबीचा महामार्ग वापरला तेवढाच टोल त्याने भरावा यासाठी सर्व फास्टटॅग हेवाहन ट्रॅकिंग सिस्टीमला जोडण्याबाबत चाचण्या सुरु आहेत. 

  • ज्या कंपनीचा व्यवसाय वाहतुकीच्या अबलंबून आहे त्यांना आधील वेगवान व तत्पर सेवा देणे शक्य होते. 

  • शासकीय योजनांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी वाहन ट्रॅकिंग सिस्टीम अनिवार्य करण्यात आले आहे. 


महत्त्वाचे: 

  • चोरी केलेल्या वाहनाचा वापर अतिरेकी किंवा गुन्हेगारी कृत्यासाठी केला जात असल्याने यापुढील सर्व वाहनांवर केंद्रीय परिवहन विभागाने सर्व वाहन उत्पादक कंपन्यांना वाहन ट्रॅकिंग सिस्टीम बसविणे अनिवार्य केले आहे. 

  • केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी अनेक वेळा या तंत्रज्ञानाचा संसदेत उल्लेख केला आहे. 

  • महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांतील विधिमंडळात यावर चर्चा घडून आली आहे. 

  • किंमत रुपये ३०००/- पासून पुढे व वार्षिक खर्च रु. १५०० ते २५००/- रुपये फक्त 

  • सर्व प्रकारच्या वाहनांस उपयुक्त - दुचाकी, चारचाकी, मालवाहतूक, प्रवासी 



डॉ. सुभाष कारंडे 

सहाय्यक प्राध्यापक, भूगोलशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अनवट सातारा भाग - २ : साताऱ्याचे ॲमेझॉन काठी-अवसरी

युद्ध नको बुद्ध हवा!

दरड दुर्घटनेतील बळी? नव्हे सरकारी अनास्थेचे बळी!