पोस्ट्स

शेतकरी बळीराजा

इमेज
शेतकरी बळीराजा म्हणती हो मला  भिक नको फक्त हमीभाव द्या पिकाला पिक माझ पिकली सोन्यावाणी  नजर लागावी अशी नक्षत्रावणी  वाटत असेल सोन्याचे दिन यावे शेतकऱ्याच्या घरी  एकच सांगतो सरकार तुम्हाला  कर्जमाफी नको हमीभाव द्यावा पिकाला शेतकरी बळीराजा म्हणती हो मला  भिक नको फक्त हमीभाव द्या पिकाला दलाल आडते आम्हा छळणार  दोन रुपड्याचा चेक हाती टेकवणार  आया बहिणींची अब्रू सावकार लुटणार     वाटत असेल आम्ही घेऊ नये फास  शेती विमा मिळो आमच्या पिकाला भिक नको फक्त हमीभाव द्या पिकाला पिकाविणार मी अन भाव ठरविणार तुम्ही  कस जगायचं सांगा आम्ही  लग्नाला आल पोरग कोणी पोरगी देईना त्याला. कधी तरी जगाच्या पोशिन्द्याची दया यावी तुम्हाला      भिक नको फक्त हमीभाव द्या पिकाला डॉ. सुभाष कारंडे 

भारतातील सर्वात मोठा बेसाल्ट खडकातील नैसर्गिक पूल (शिलासेतु)

इमेज
  भारतातील सर्वात मोठा बेसाल्ट खडकातील नैसर्गिक पूल (शिलासेतु) आणे घाट, ता. जुन्नर जि. पुणे नगर - कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ ने प्रवास करत असताना बेल्हे हे आठवडी बाजाराचे ठिकाण सोडल्यानंतर गूळूंचवाडी हे छोटे गाव लागते. या गावापासून सुरू होतो आणे घाट. या घाटातील दुसर्‍या वळणावर छोटेसे गणेश मंदिर आहे. या मंदिरापासून एक पाऊल वाट दरीकडे जाते. या खोल दरीत मळगंगा देवीचे टुमदार मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारी आपल्या नजरेस पडतो. बेसाल्ट खडकातील नैसर्गिक पूल. याला शिलासेतु असेही म्हणतात. लाव्हारसापासून दख्खनच्या पठाराची निर्मिती होत असताना महाकाय खडक दरीत आडवा तयार झाला. दरीत आडव्या आलेल्या खडकाने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवून बांध तयार केला. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरलेला महाकाय खडक फोडण्याच्या कार्याला पाण्याने हळूहळू सुरवात केली. अन अखेर खडकाच्या खाली छोटेसे छिद्र पाडून पाण्याने त्याच्याखालून आपली वाट अखेर काढलीच. हजारो वर्षांपासून खडक आणि त्याच्याखालून वाहणार्‍या धो-धो वहाणार्‍या पाण्याच्या धारेने खडकाच्या खाली साधारणपणे 10 मी उंचीचा आणि 22 मी लांबीचा शिलासेतू...

भेदभाव

  भेदभाव भेदभावाची काही तरी सीमा असते ना राव सौंदर्य प्रसाधनाच्या सर्व जाहिराती तिच्या वाट्याला  अन खाज खुजली खरूज याच्या जाहिराती माझ्या वाट्याला  भेदभावाची काही तरी सीमा असते ना राव कुंकू मंगळसुत्र, दागदागिने सगळं सगळं तिच्याच वाट्याला  माझ्या वाट्याला मात्र मोकळ कपाळ  कधी तरी मलाही लावू द्द्याना तिच्या माहेरचे आडनाव  भेदभावाची काही तरी सीमा असते ना राव सण उत्सवात तिचा मान  कायद्यातही तिलाच सन्मान  आमच्याही रक्षणासाठी एखादा कायदा कराना राव  भेदभावाची काही तरी सीमा असते ना राव तिला पाहण्यासाठी कट्ट्यावर आम्ही रोज बसतो  येता जाता तिला चोरून पाहतो  गावातील शेंबड पोरगं सुद्धा आम्हाला टुकार म्हणतेय ना राव  भेदभावाची काही तरी सीमा असते ना राव प्रा. डॉ. सुभाष कारंडे

काशिनाथ ते दाते सर.. एका शेतमजुराच्या मुलाचा प्रवास..

इमेज
  काशिनाथ ते दाते सर .. एका शेतमजुराच्या मुलाचा प्रवास .. कण्हेर आणि पोखरी ही पारनेर तालुक्याच्या उत्तरेला एकमेकांपासून ४ किमी अंतरावर असणारी दोन स्वतंत्र गावे. पोखरी हे यातील सर्वात मोठे गाव परंतु भारतासह नेपाळमध्ये सुध्दा पोखरी नावाची अनेक गावे असल्याने बऱ्याचदा नेमकी कोणती पोखरी हा प्रश्न दुसऱ्या जिल्ह्यातील लोकांना नेहमी पडायचा. मग आपसूकच पोखरीच्या पुढे कण्हेर लागून कण्हेर-पोखरी अशी ओळख तयार झाली आणि आजही ती तशीच आहे. दुष्काळ या भागामध्ये पाचवीला पुजलेला त्यामुळे या भागातील लोक नोकरी आणि व्यवसायासाठी पुणे-मुंबईला जात असत आणि मजुरी, हमाली, मेंढीपालन करून आपला उदरनिर्वाह करत. मांडओहळ धरण झाल्याने धरण परिसरातील बरीचशी जमीन बागायती बनली परंतु दोनवेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्या शेतकरी मजुरांच्या शेतात पाणी येणे ही अशक्यप्राय बाब. मग यातूनच सुरु झाला कण्हेर-पोखरी भागातून एक-एक हिरा जन्माला येण्याचा प्रवास.  कण्हेरपासून पूर्वेला एक किमी अंतरावर गाढवेझाप नावाची छोटी वस्ती आहे. या वस्तीवर सोनाबाई आणि महादू यांच्या घरात काशिनाथ यांचा जन्म झाला. दाते दाम्पत्याला एकूण ७ मुले यातील का...

वाहन ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजे काय?

इमेज
  वाहन ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजे काय? जीपीएस उपग्रहाच्या आधारे जमिनीवर आपल्या वाहनाचे अचूक स्थान दर्शविणाऱ्या तंत्रास वाहन ट्रॅकिंग सिस्टीम असे म्हणतात. याद्वारे आपल्या वाहनाचे वर्तमान स्थान आपल्या स्मार्टफोनवर किंवा संगणकावर उपलब्ध होते. आवश्यकता  वाहन ट्रॅकिंग सिस्टीम कार सुरक्षित ठेवण्यासाठी आणि चोरी रोखण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे.  याद्वारे आपल्या कारची प्रत्येक मिनिटाची माहितीही मिळू शकते.  कोणत्याही कारमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवल्यास त्याच्या मदतीने चालकांच्या हालचालींवरही पूर्ण नजर ठेवता येते. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.  मागील एक ते तीन महिन्यापर्यंत वाहनाच्या हालचालीबाबत माहिती उपलब्ध  होते.  वाहनाने जितक्या लांबीचा महामार्ग वापरला तेवढाच टोल त्याने भरावा यासाठी सर्व फास्टटॅग हे वाहन ट्रॅकिंग सिस्टीमला जोडण्याबाबत चाचण्या सुरु आहेत.  ज्या कंपनीचा व्यवसाय वाहतुकीच्या अबलंबून आहे त्यांना आधील वेगवान व तत्पर सेवा देणे शक्य होते.  शासकीय योजनांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी वाहन ट्रॅकिंग सिस्टीम अनिवार्य करण्यात आले आ...

अनवट सातारा भाग - २ : साताऱ्याचे ॲमेझॉन काठी-अवसरी

इमेज
  साताऱ्याचे ॲमेझॉन  काठी-अवसरी नजर पोहचेल तिकडे घनदाट जंगल, दऱ्या खोऱ्यांमध्ये पसरलेले विभिन्न रंगाचे अथांग पाणी, ऑक्सिजनचा मुबलक साठा, प्रदूषणाचा लवलेशही नाही, पाण्यात सूर मारून मासा पकडून वर झेप घेणारे पक्षी, समृद्ध जैवविविधतेसह अतुलनीय सौंदर्य, ढगाला गवसणी घालणाऱ्या पर्वतरांगा हे काय ॲमेझॉनचे वर्णन नाही. हे तर आहे आपल्या साताऱ्यातच. पाटण तालुक्यातील वनकुसवडे पठाराच्या छायेत, शिवसागर जलाशय आणि कोयना अभयारण्याच्या कुशीत प्रत्येकाला साद घालणारी हे दोन गावे म्हणजे काठी आणि अवसरी. पाटणपासून २९ कि.मी. तर साताऱ्यापासून ४६ किमी अंतरावर ही दोन गावे वसलेली आहेत. तसेच कोयना धरणापासून हे अंतर ११ किमी असून लाँचने सुध्दा या परिसरात येऊन फेरफटका मारता येतो. सातारा - गजवडी- ठोसेघर - चाळकेवाडी - वनकुसवडे - काठीटेक - अवसरी - काठी असा प्रवास करून  सातार्‍याच्या ॲमेझॉनला पोहोचता येते. साताऱ्याहून जाताना वाटेतच समर्थांचा सज्जनगड, ठोसेघरचा उंच दरीतून कोसळणारा मोठा आणि त्याच्याच वर असलेला छोटा धबधबा, चाळकेवाडी - वनकुसवडे पठारावरील बहरलेली रंगबेरंगी फुले, आशिया खंडातील सर्वात मोठ्या पवनऊर्ज...

युद्ध नको बुद्ध हवा!

इमेज
  युद्ध नको बुद्ध हवा!  अंधारात चाचपडणार्‍या जगाला माणुसकीचा दिवा हवा धर्म जातीच्या आधारे एकमेकांचा गळा घोटणाऱ्या व्यवस्थेला समानतेचा संदेश हवा  युद्ध नको बुद्ध हवा!  स्वार्थासाठी हैवान बसलेल्यांना प्रेमाचा ओलावा हवा खोट्या राष्ट्रभक्तीचा बुरखा पांघरलेल्यांना देशभक्तीचा हुंकार हवा युद्ध नको बुद्ध हवा!  सोशल मीडियाच्या युगात गरळ ओकणाऱ्यांना नैतिकतेचा आरसा हवा  वाट चुकलेल्या वाटसरूंना विवेकी रस्ता हवा  युद्ध नको बुद्ध हवा!  व्यवस्थेने नाकारलेल्यांना जगण्याचा आधार हवा  रक्ताच पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला सन्मानाचा भाव हवा  युद्ध नको बुद्ध हवा!  देश रक्षणासाठी तळहातावर प्राण घेतलेल्या सैनिकास आपल्या प्रेमाचा सलाम हवा  भारत भूच्या अंगा-खांद्यावर खेळणाऱ्या प्रत्येकाच्या नसानसात भारत माझा देश हवा  भारत माझा देश हवा  युद्ध नको बुद्ध हवा!  युद्ध नको बुद्ध हवा!  डॉ. सुभाष कारंडे, सातारा